BJP manifesto : उ. प्रदेशमध्‍ये भाजपचे संकल्‍प पत्र जाहीर : लव्‍ह जिहाद प्रकरणातील दाेषींना कठोर शिक्षा, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन , शेतकर्‍यांना मोफत वीज | पुढारी

BJP manifesto : उ. प्रदेशमध्‍ये भाजपचे संकल्‍प पत्र जाहीर : लव्‍ह जिहाद प्रकरणातील दाेषींना कठोर शिक्षा, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन , शेतकर्‍यांना मोफत वीज

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज संकल्‍प पत्र ( BJP manifesto ) जाहीर केले. यामध्‍ये लव्‍ह जिहाद प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन , शेतकर्‍यांना मोफत वीज आदींसह अनेक आश्‍वसनांचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ, उपमुख्‍यमंत्री केशव प्रसाद मौर्या, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकुर आदी उपस्‍थित होते. या वेळी संकल्‍प पत्राबरोबर ‘कर के दिखाया है’ हे निवडणूक गीताचेही अनावरण करण्‍यात आले.

BJP manifesto : लव्‍ह जिहाद प्रकरणातील दोषींना कठाेर शिक्षा

भाजपने आपल्‍या संकल्‍पपत्रामध्‍ये लव्‍ह जिहाद प्रकरणातील दोषींना १० वर्षांच्‍या कारावासासह १ लाख रुपय दंडाची शिक्षेच्‍या तरतूद करणार असल्‍याचे म्‍हटलं आहे. तसेच महिला सशक्‍तीकरणाचा नाराही दिला आहे. त्‍याचबराेबर शेतकर्‍यांना शेतीसाठी मोफत वीज, विधवा निवृती वेतन प्रति महिना ८०० रुपयांहून दीड हजार रुपये करणे, होळी आणि दिवाळी सणानिमित्त महिलांना दोन मोफत घरगुती सिलिंडर, ६० वर्षांवरील महिलांना उत्तर प्रदेश परिवहनचा मोफत प्रवास, २ कोटी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, कॉलेज विद्‍यार्थ्यांनींना मोफत स्‍कूटी, अयोध्‍यामध्‍ये आंतरराष्‍ट्रीय विमानतळ निर्मिती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील तरुणींच्‍या विवाहासाठी २५ हजार रुपये (यापूर्वी ही रक्‍कम १५ हजार होती), सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि शिक्षण संस्‍थांजवळ सीसीटीव्‍ही बसविणार, प्रत्‍येक जिल्‍ह्यात डायलेसिस सेंटर तयार करणार, राज्‍यात २५ नवे सरकारी वैद्‍यकीय महाविद्‍यालय, स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, दिव्‍यांगांना दीड हजार रुपये प्रतिमहा पेन्‍शन, बांधकाम कामगारांना मोफत विमा, बांधकाम कामगारांच्‍या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण आदी आश्‍वासनांचा भाजपच्‍या संकल्‍पपत्रात समावेश आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button