Nana Patole : महाराष्ट्रात काँग्रेसकडून उद्यापासून भाजप कार्यालयासमोर आंदोलन | पुढारी

Nana Patole : महाराष्ट्रात काँग्रेसकडून उद्यापासून भाजप कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : कोरोनाच्या महामारीत देशाच्या जनतेचे काँग्रेसने रक्षण केले. देशातील कित्येक लोकांना आधार देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. यामुळे राज्यासह देशातील जनता मोदींच्या सरकारला चांगलीच जागा दाखवणार आहे. याविरोधात राज्यात आम्ही जोरदार आंदोलन करणाार आहे, अशी माहिती आज (दि.०८) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nana Patole)

या वेळी पटाेले म्हणाले की, मोदींनी महाराष्ट्राचा आणि जनतेचा अपमान केला आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत होते. त्यावेळी मोदींना कोरोना दिसला नाही का? मोदीजींनी सध्या खोट बोलयचे पण रेटून बोलायचे असा ठेका धरला आहे. राज्यातील भाजप कार्यालयासमोर उद्यापासून आम्ही आंदोलन करणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले…

“कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मर्यादेचा कळस गाठला होता. राजकारण केलं. काँग्रेसने महाराष्ट्रातून मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं. महाराष्ट्रातून कामगारांना रेल्वेचं तिकीट काढून पाठवून दिलं.

काँग्रेस अफवा परवून अडचणी आणखी वाढविल्या. त्यामुळे कोरोना परसविण्यास काँग्रेस जबाबदार आहे”, असा थेट हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत होते. मोदी म्हणाले की, “कोरोना काळात शेतकऱ्यांवर अडचणी येणार नाहीत, याची आम्ही खबरदारी घेतली. आम्ही शेकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिलो. त्यांना सहकार्य केलं. गतिशक्ती योजनेवर काम सुरू आहे.पाच वर्षांत पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक क्षेत्रात उत्पन्न वाढतं आहे. छोट्या उद्योगांसाठी ३ लाखांची मदत करण्यात आली”, असंही त्यांनी संसदेत सांगितलं.

“काही लोकांना निर्यातीतील वृद्धी पाहवत नाही. मेक इन इंडिया होणार नाही, ही काॅंग्रेसची भाषा आहे. काॅंग्रेस या योजनेची खिल्ली उडवली. नकारात्मकता पसरविण्याचं काम काॅंग्रेसने केलं आहे. १०० वर्षांत पहिल्यांदाच आलेल्या कोरोना महामारीत महागाई आकाशाला भीडणार नाही, याची आम्ही दक्षता घेतली.

२०१४ ते २०२२ पर्यंत महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी राहिला आहे. परावलंबी देश स्वतःची सुरक्षा कधीच करू शकत नाही. भारताने डिफेन्समध्येही निर्यातीची पावलं टाकली आहेत”, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

Back to top button