Punjab Election : पंजाबमध्ये पाचवर्षांसाठी असेल एकच मुख्यमंत्री | पुढारी

Punjab Election : पंजाबमध्ये पाचवर्षांसाठी असेल एकच मुख्यमंत्री

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : पंजाबमध्ये ( Punjab Election ) पाच वर्षांमध्ये दोन मुख्यमंत्री बनविण्याच्या रोटेशन सिस्टीम अफवांना काँग्रेसने ( congress ) खोटे ठरवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी (Rahul Gandhi) रविवारी (दि. ६) मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करतील. तसेच हा एकच उमेदवार पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री असणार आहे.

काँग्रेसमध्ये (Punjab Election) मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) या दोघांना घेऊन राहूल गांधी लुधियानामध्ये एक मोठी सभा घेऊन दोघांनाही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषीत करतील असा कार्यक्रम आधी ठरविण्यात आला होता. पण, आता सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने याबाबतचे मत बदलले असल्याचे समजते. पूर्वी पाच वर्षांसाठी रोटेशन पद्धतीनुसार दोन मुख्यंमत्री होतील अशी चर्चा होती. पण, या सर्व चर्चांना फाटा देत आता पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री असेल असे काँग्रेसने ठरवल्याचे समजते. तसेच या पूर्ण पाचवर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचे नाव देखिल घोषित केले जाईल.

मुख्यमंत्री चरणसिंह चन्नी (Punjab Election) यांच्या भाच्याला काल अवैध वाळू उत्खनन प्रकरणी काल (दि.४) ईडीने (Enforcement Directorate) ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसने अशा प्रकराचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर सिद्धू यांनी आपल्याच पक्षावर हल्ला करत म्हणाले, ‘पक्षाने स्वच्छ चारित्र्यांच्या आणि प्रामाणिक व्यक्तीची निवड करणे गरजेचे आहे’.

यापूर्वी काँग्रेसने मुख्यमंत्री कोण असावा यासाठी अनेक संकेत दिले होते. यासाठी पक्षाने पंजाबमध्ये अंतर्गत एक सर्वे देखिल केला होता. की, पंजाबची जनता कोणाला मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छिते. यासर्व स्पर्धेत चरणसिंह चन्नी हे आघाडीवर होते. चन्नी यांच्या नातेवाईकास काल अटक झाल्यावर या संधीचा फायदा घेत सिद्धू यांनी चन्नीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सिद्धू म्हणाले,‘ जर तुम्ही नैतिक अधिकार गमावलेल्या, अप्रामानिक, भ्रष्टाचार आणि माफियाबाजीमध्ये ज्याचा सहभाग आहे, अशा व्यक्तीची निवड कराल तर लोक तुम्हाला उखडून फेकून देतील.’

 

Back to top button