इस्लामपूर : जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांची दै. ‘पुढारी’च्या कार्यालयास सदिच्छा भेट
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी शनिवारी दै. 'पुढारी'च्या इस्लामपूर विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ना. जयंत पाटील यांच्याहस्ते पुढारीकार पद्मश्री ग.गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दै. 'पुढारी'चे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
सन २००३ साली इस्लामपूर येथे सुरु झालेल्या दै. 'पुढारी' च्या कार्यालयाचे उद्घाटन ही ना. जयंत पाटील यांच्याहस्ते व मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर १८ वर्षांनी ना. जयंत पाटील यांनी आज दै. 'पुढारी'च्या नव्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी राजकीय घडामोडी व अन्य विषयावर समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच कार्यालयाच्या कामकाजाबाबत कार्यालय प्रमुख प्रा. अशोक शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. तसेच मुख्य संपादक पद्मश्री डाॅ. प्रतापसिंह जाधव यांच्या तब्बेतीचीही आस्तेवाईकपणे चौकशी केली.
यावेळी , सांगली कार्यालयाचे असीस्टंट ब्युरो चीफ युवराज पानारी, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे, उपसंपादक सुनील माने, मार्केटींग एज्युकेट एक्झिटीव्ह सतीश कुंभार, वार्ताहर मारुती पाटील , संदीप माने, शिराळा प्रतिनिधी विठ्ठल नलवडे, धन्वंतरी परदेशी, विजय शिंदे, धनाजी चव्हाण, संदीप परीट, विनायक गायकवाड, ज्ञानदेव शिंदे, शिवानी जाधव, अभिजीत यादव, आदित्य का़बळे, रोहीत कांबळे उपस्थित होते.
हे ही वाचलं का

