नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १५२% रोजगार वाढ! केंद्रीय मंत्री रामेश्वर तेलींची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १५२% रोजगार वाढ! केंद्रीय मंत्री रामेश्वर तेलींची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

देशांतर्गत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या काळात रोजगारात तब्बल १५२% वाढ झाली. अखिल भारतीय तिमाही आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षणाचा (एक्यूईईएस) दाखला देत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली.

सर्वेक्षणानूसार अर्थव्यवस्थेच्या निवडक नऊ क्षेत्रांतील रोजगारात २९% वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल-२०२१ पासुन केंद्र सरकारने हे सर्वेक्षण सुरू केले. एप्रिल ते जून २०२१ या कालावधीसाठी तिमाही रोजगार सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीनुसार, या निवडक क्षेत्रांमध्ये रोजगार वाढून ३.०८ कोटींपर्यंत पोहोचला.

२०१३-१४ मध्ये सहाव्या आर्थिक जनगणनेच्या नोंदीनुसार या क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या एकूण २.३७ कोटी रोजगारांच्या तुलनेत ही वाढ २९% आहे. माहिती तंत्रज्ञान, बीपीओ क्षेत्रात सर्वाधिक १५२% वाढीसह आरोग्य क्षेत्रात ७७%, शिक्षण क्षेत्रात ३९%, उत्पादन क्षेत्रात २२%, वाहतूक क्षेत्रात ६८% आणि बांधकाम क्षेत्रात ४२% वाढ झाली. वार्षिक श्रम बल सर्वेक्षण (पीएलएफएस) अहवालानुसार, देशातील सर्वसाधारण स्थितीच्या आधारे १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी अंदाजे बेरोजगारी दर २०१७-१८ मध्ये ६, २०१८-१९ मध्ये ५.८ आणि २०१९-२० मध्ये ४.८ इतका असल्याचे तेली म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news