Budget 2022 : जाणून घ्‍या, काय आहे पीएम गती शक्‍ती योजना? | पुढारी

Budget 2022 : जाणून घ्‍या, काय आहे पीएम गती शक्‍ती योजना?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्‍प सादर केला. यामध्‍ये त्‍यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी ( Budget 2022 )  मोठ्या घोषणा केल्‍या असून, यामध्‍ये पीएम गती शक्‍ती योजनेचा समावेश आहे. जाणून घेवूया ही योजना नेमकी कशी आहे…

Budget 2022 : ०७ लाख कोटी रुपयांची तरतूद

पीएम गती शक्‍ती योजनेचा ही देशातील पायाभूत सुविधांच्‍या प्रकल्‍पावर जोर देईल. या योजनेसाठी यावर्षी १०७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. यातून देशातील पायाभूत सुविधा रेल्‍वे आणि रस्‍ते यांचा विस्‍तार होणार आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

Budget 2022 : १६ मंत्रालय हे एका डिजिटल प्‍लेटफॉर्मवर येतील

या योजनेतून रेल्‍वे आणि रस्‍त्‍यांबरोबर एकुण १६ मंत्रालय हे एका डिजिटल प्‍लेटफॉर्मवर येतील. हे सर्व मंत्रालय डिजिटल प्‍लेटफॉर्मच्‍या माध्‍यमातून मोठ्या योजनेसाठी एक समन्‍वय साधता येईल. सर्व मंत्रालयांना एकमेकांच्‍या योजनांची परिपूर्ण माहिती मिळेल. सर्व मंत्रालय एकाच पोर्लटवर आल्‍याने पायाभूत सुविधांची उभारणी करताना कोणत्‍या विभागाचा अडसर आला आहे, याची माहिती मिळेल. तो तत्‍काळ तो दूर करण्‍यासाठी ही प्रयत्‍न केले जातील.

पीएम गती शक्‍ती योजनाच्‍या माध्‍यमातून पुढील तीन वर्षांमध्‍ये वंदे भारत पुढील तीन वर्षांमध्‍ये ४०० नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्‍यात येतील. तसेच १०० पीएम गती शक्‍ती कॉर्गो टर्मिनलही तयार केले जातील. तसेच या योजनेतून वर्षभरात २५ हजार किलोमीटर महामार्गाचा विस्‍तार होईल. डोंगराळ राज्यांमध्ये रोप वेसह पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यावर जोर दिला आहे. याअंतर्गत ६० किमी लांब ८ रोप वे बनविण्याचीही या योजनेत समावेश आहे. या योजनेतून एक उत्‍पादन, एक यंत्रणा या आधारे देशातील व्‍यापार्‍यांची संपर्क जाळे तयार केले जाईल. या योजनेच्‍या माध्‍यमातून देशातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होईल, त्‍याचबरोबर या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होईल, असा विश्‍वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्‍यक्‍त केला.

Back to top button