पुढारी ऑनलाईन डेस्क
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२२ चा अर्थसंकल्पबद्दल (union budget 2022) ट्विट करत टीकेची झोड उठवली आहे. मोदी सरकारचे झिरो सम बजेट आहे. (M0di G0 Government's Zer0 Sum Budget!)
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, " अर्थसंकल्पात पगारदार वर्गासाठी, मध्यम– मध्यमवर्गासाठी, गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME sector) काेणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. मोदी सरकारचा हा झिरो सम बजेट आहे". या ट्विटवर संमिश्र कमेंट्स येत आहेत.
union budget 2022 – सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार्या पहिल्या महिला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प ठरला. सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.
हेही वाचलंत का ?