भारतीय लष्कराकडून चीन-सीमेजवळील LAC वर ‘स्विच’ ड्रोनचा वापर | पुढारी

भारतीय लष्कराकडून चीन-सीमेजवळील LAC वर 'स्विच' ड्रोनचा वापर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय लष्कर शक्तिशाली अल्ट्रा-लाइट ड्रोन ‘स्विच’ चीन-सीमेजवळील LAC वर उच्च-उंचीच्या मोहिमेसाठी वापरले जाणाार आहे.  यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा भारतीय कंपनी IdeaForge सोबत करार केला आहे. याआधी गेल्या वर्षीही याच कंपनीला ‘स्विच’ ड्रोनची ऑर्डर मिळाली होती.

भारतीय सैन्याने IdeaForge सोबत गेल्या वर्षी जानेवारी मध्ये उच्च-उंची स्विच ड्रोनच्या खरेदीसाठी सुमारे 20 डॉलर किंमतीचा करार केला होता.  एका वृत्तानुसार, विचारविनिमय आणि मूल्यमापनानंतर या भारतीय फर्मची ‘स्विच’ ड्रोन डीलसाठी निवड करण्यात आली. त्यावेळी जलदगती खरेदीसाठी त्याची निवड करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीने म्हटले होते की, आयडियाफोर्जच्या स्विच ड्रोनच्या संख्या एका वर्षाच्या आत भारतीय लष्कराला (Indian Army) पुरवली जाईल.

भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर (LAC) पाळत

मुंबईतील (Mumbai) एका कंपनीला स्विच ड्रोनची ऑर्डर मिळाली आहे. अलीकडेच, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पाळत ठेवणे अधिक मजबूत करण्यासाठी Switch1.0 ड्रोनच्या उच्च उंचीच्या आवृत्तीच्या खरेदीसाठी IdeaForge सोबत पुन्हा करार केला आहे. नव्या ऑर्डरमध्ये किती ड्रोनची ऑर्डर देण्यात आली आहे आणि त्याची किंमत किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीने सांगितले की भारतीय लष्कराने त्याच UAV साठी आणखी ऑर्डर दिल्या आहेत.  स्विच 1.0 UAV हे स्थिर-विंग ड्रोन आहे जे उभ्या टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी सक्षम आहे आणि अत्यंत उंचीवर आणि कठीण परिस्थितीत दिवस-रात्र निरीक्षणासाठी तैनात केले जाऊ शकते. कंपनीने आपल्या निवेदनात संरक्षण अधिकार्‍याचा हवाला देत म्हटले आहे की, आम्हाला स्विच 1.0 UAV ची डिलिव्हरी वेळेवर मिळाली आहे आणि आम्ही या मजबूत तंत्रज्ञानाचा जलद समावेश करून आमच्या उत्तर आणि पूर्व सीमा मजबूत करत आहोत.

भारतीय सैन्याला ड्रोनची गरज

IdeaForge च्या मार्केटिंगच्या महाव्यवस्थापक कृती अरमानमादा म्हणाल्या, भारतीय सैन्याला अशा ड्रोनची गरज होती जी खांद्यावर घेऊन जाऊ शकेल आणि शत्रूच्या आव्हानांवर मात करू शकेल. अर्थात कंपनीला त्या आव्हानांना सामोरे जावे लागले पण कंपनीने ते पूर्ण केले. आणखी एक कारण म्हणजे लष्कराला उंचावरील ड्रोनची गरज होती. जसजशी उंची वाढते तसतशी हवा पातळ होते आणि बहुतेक फ्लाइट्सना तिथे पोहोचणे कठीण होते. हे ड्रोन उंचावर आणि प्रतिकूल हवामानात तैनात केले जाऊ शकते.

ड्रोनची वैशिष्ट्ये

स्विच ड्रोन उच्च उंचीवर आणि प्रतिकूल हवामानात दिवस-रात्र निरीक्षणासाठी तैनात केले जाऊ शकते. या स्विच ड्रोनचे वजन सुमारे 6.5 किलो आहे. हे हेलिकॉप्टरप्रमाणे उभ्या टेक ऑफ करण्यास सक्षम आहे. हे ड्रोन कमी तापमान, जोरदार वारे आणि हवेची कमी घनता असलेल्या उच्च उंचीवरही दोन तास उडू शकते. हे ड्रोन कुठेही तैनात केले जाऊ शकते. हे 15 किलोमीटरपर्यंत निरीक्षण करण्यास सक्षम आहे. तसेच हे 4000 मीटर उंचीवरून लॉन्च केले जाऊ शकते.

हे ही वाचलं का 

Back to top button