संसद मार्च : शेतकरी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या चिंतेत वाढ! | पुढारी

संसद मार्च : शेतकरी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या चिंतेत वाढ!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शेती सुधारणा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी गेल्या २३७ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. शेतक-यांनी आक्रामक भूमिका घेतली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर उद्या, गुरूवारी संसद मार्च काढण्याच्या अनुषंगाने शेतकरी आंदोलक रणनीती ठरवत आहेत.

यूपी गेट परिसरात संसद मार्च संबंधी शेतकरी संघटनांकडून खलबत करण्यात आले.

पंरतु, शेतकऱ्यांना संसदेपर्यंत मार्च काढण्याची परवानगी अद्याप दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. राजधानीत त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक वाचा :

शेतक-यांना सुरक्षितरित्या जंतर-मंतर पर्यंत घेवून जाण्यात येईल, असे दिल्ली पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे.

सिंघू बॉर्डर वरून २०० शेतकरी आंदोलन पाच बसेसच्या सहाय्याने संसदेच्या दिशेने आगेकुच करतील, अशी माहिती भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी धर्मेंद्र मलिक यांनी दिली.

तुर्त शेतकरी आंदोलकांच्या निश्चित संख्येसंबंधी पोलिसांकडून कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही.

दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या संसद मार्च च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अनुषंगाने मंथन करण्यात आल्याचे कळतेय.

अधिक वाचा :

यूपी गेट वरून २२ जुलै ते ९ ऑगस्ट पर्यंत दररोज आंदोलनात सहभागी होणार्या ५ आंदोलकांची यादी संयुक्त किसान मोर्चाला पाठवण्यात येईल, असे मलिक म्हणाले.

संसद मार्च दरम्यान पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांना रोकण्यात आले, तर सर्व आंदोलक एकाचवेळी अटक देतील, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

भारतीय किसान यूनियन आंदोलकांच्या संख्ये संबंधी कुठलीही तडजोड करण्यात तयार नसल्याचे त्यामुळे बोलले जात आहे.

अधिक वाचा :

कोल्हापूर : सह्याद्रीतील अनोख्या हिरव्या बेडकाची गोष्ट

Back to top button