अर्थसंकल्पीय अधिवेशन : दोन दिवसांसाठी शून्य काळ स्थगित | पुढारी

अर्थसंकल्पीय अधिवेशन : दोन दिवसांसाठी शून्य काळ स्थगित

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सुरूवातीच्या दोन दिवसांमध्ये दोन्ही सभागृहाचा ‘शुन्यकाळ’ ३१ जानेवारी तसेच १ फेब्रुवारी ला स्थगित करण्यात आला आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण तसेच अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याचे या दिवशी शून्य काळ होणार नसल्याचे कळतेय.

केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय भाषण जवळपास दीड ते २ तासांपर्यंत चालेल. पंरतु, भाषणाचा अवधी सामान्य वेळेपेक्षा अधिक होवू शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी २०२० मध्ये २ तास ४० मिनिटांपर्यंत चालेल्या भाषणाची देशाच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालेल्या अर्थसंकल्पीय भाषण म्हणून नोंद आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत २ फेब्रुवारी ते पुढील तीन दिवसांपर्यंत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभेत २,३, ४ तसेच ७ फेब्रुवारीला चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, राज्यसभेत २, ३, ७ तसेच ८ फेब्रुवारीला अभिभाषणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ फेब्रुवारीला लोकसभा तसेच ८ फेब्रुवारीला राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या कोरोना प्रोटोकॉलचे कटाक्षाने पालन करीत होणार आहे.भैतिक दुरत्वाच्या नियमांचे पालन करीत सभागृहातील आसन व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभेच्या दोन्ही कक्षात आंगतुक कक्ष आणि सेंट्रल हॉल मध्ये संसद सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सदनाचा वेळ वेगवेगळा असेल. राज्यसभा सकाळी १० ते दुपारी ३ वाजतापर्यंत आणि लोकसभेचे कामकाज संध्याकाळी ४ ते रात्री १० पर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि सीमेवर चीन ची वाढती आगळीक मुद्यावर कॉंगेस भाजप सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button