फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी करणार; करारावर स्वाक्षऱ्या | पुढारी

फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी करणार; करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्‍ली, पुढारी ऑनलाईन : शत्रूंच्या प्रत्येक हालचालींना पराभूत करण्याच्या हेतूने भारत समुद्रात आपली शक्ती सतत वाढवत आहे. समुद्रात दबदबा कायम ठेवण्याच्या दिशेने भारताकडून आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्वदेशी प्रगत हलके हेलिकॉप्टर (ALH) MK-3 विमान (MK III Aircraft) औपचारिकपणे INS मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी आज हे विमान पोर्ट ब्लेअर येथे समाविष्ट केले आहे.

कोण बनवते ALH Mk-III विमान

ALH Mk-III विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी बनवते. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने चालना देण्याच्या अनुषंगाने सरकारने लष्करी विमानांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे घेतलेली ही मोठी झेप आहे. आतापर्यंत 300 हून अधिक विमाने HAL द्वारे वितरित केली आहेत. तसेच सशस्त्र दलांमध्ये ही वापरली जातात. याच्या विविध विमानापैकी Mk-III प्रकार हे सागरी विमान आहे. अत्याधुनिक सेन्सर्स आणि शस्‍त्राचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

सुरक्षेला मिळणार चालना

शक्तीशाली इंजिन, प्रगत सागरी गस्ती रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल पेलोड आणि नाईट व्हिजन उपकरणांसह ALH Mk III विमान भारताच्या पूर्वेकडील सागरी किनारा आणि बेट क्षेत्र सुरक्षित बनवण्यासाठी काम करेल. या विमानाव्दारे समुद्रावर पाळत ठेवली जाईल. तसेच विशेष दलांसाठी सपोर्ट सिस्टीम यासह अनेक क्षमता यामध्ये आहेत.

लेफ्टनंट जनरल अजय सिंग माध्यमांशी बोलताना म्‍हणाले की,  अंदमान आणि निकोबारच्या सुरक्षेला चालना देणारे हे विमान आहे. तसेच  हे विमान देशाच्या सुरक्षेसाठी आणि प्रदेशात शांतता राखण्यासाठी स्वावलंबी होण्याच्या संकल्पाचे प्रतीक देखील आहे.

फिलीपिन्सची भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची खरेदी

भारत आणि फिलीपिन्सने ब्रह्मोस सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी 374.96 डॉलर किंमतीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या क्षेपणास्त्र निर्माता कंपनीसोबत हा करार करण्यात आला आहे. फिलीपिन्स आपल्या नौदलासाठी भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देखील खरेदी करत आहेत. यावेळी फिलीपिन्सचे सर्वोच्च संरक्षण अधिकारी उपस्थित होते. तर भारताचे प्रतिनिधित्व त्यांच्या राजदूताने केले. फिलिपाइन्स आपल्या किनाऱ्यावर तैनात केल्या जाणाऱ्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करत आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button