ब्रेकिंग : कर्नाटकचे माजी सीएम येडियुरप्पा यांची नात सौंदर्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला | पुढारी

ब्रेकिंग : कर्नाटकचे माजी सीएम येडियुरप्पा यांची नात सौंदर्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला

बंगळूर ; पुढारी ऑनलाईन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिचा मृतदेह बेंगळुरू येथील एका खासगी अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. कर्झन हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम केले जात आहे. याबाबत येडियुरप्पा यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 30 वर्षीय सौंदर्या बंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पती, सहकारी डॉक्टर आणि सहा महिन्यांच्या मुलासोबत माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहत होती. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते.

दरम्यान, पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सौंदर्याने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. Bowring hospital मध्ये सौंदर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलीसांनी म्हटले आहे. सौंदर्या बंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. ती पतीसह राहत होती. सौंदर्याचे पती सुद्धा डॉक्टर आहे.

Back to top button