'प्रगती करायची, अशी जिद्द असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
इंटरनेटवर तुम्हाला अचंबित करणारे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. त्याचबरोबर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओने तुम्ही आवाक होता. असाच एका बकरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बकरी काही सेंकदमध्ये भिंतींवर चढून जाते. क्षणभर असे वाटतं की, बकरी हवेत उडतच आहे. बकरीचे या कामगिरीने अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत तर काही विचारात पडले आहेत.
व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच याबरोबर एक प्रेरणादायी कॅप्शन लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ज्यांच्यामध्ये पुढे जाण्याची जिद्द असते त्यांना परिस्थिती काय थांबवणार?. हा व्हिडीओ आतापर्यंत ४७ हजारांहून अधिक जणांना पाहिला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, जो वारंवार तक्रारी करतो तो हरतो. जो वारंवार प्रयत्न तोच जिंकतो.
जिसमें ज़िद है आगे बढ़ते जाने की,
उसे परिस्थितियां क्या खाक रोकेंगी! pic.twitter.com/Tt5C0BDjFw— Dipanshu Kabra (@ipskabra) January 24, 2022
हेही वाचलं का?
- #RepublicDay : आयटीबीपीच्या हिमवीरांनी उणे ३५ डिग्री तापमानात साजरा केला प्रजासत्ताक दिन (व्हिडिओ)
- RRB NTPC Result Violence : बिहारमध्ये ‘एनटीपीसी’ परीक्षार्थींचा उद्रेक, अनेक ठिकाणी रेल रोको, दगडफेक
- Google Cloud : आता गुगल उघडणार पुण्यात ऑफिस; तरुणांना नोकरीची नामी संधी