मुंबई, पुढारी ऑनलाईन : गुगलसारखी नामांकित आणि सर्वात मोठ्या कंपनीने भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. गुगलने सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची योजना जाहीर केली. (Google Cloud)
या योजनेद्वारे एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान (Google Cloud) तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्यात येणार आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत हे सुरू होईल, अशी अपेक्षा आहे, ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचं शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुगलने आपल्या देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती सुरु केलेली आहे. त्याचबरोबर आता पुण्यातील ऑफिस सुरु झाल्यानंतर इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात गुगलकडून असं सांगण्यात आलं आहे की, "एक IT हब म्हणून पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला उच्च प्रतिभेचा वापर करण्यास सक्षम करेल. कारण, आम्ही आमच्या वाढत्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा विकसित करत आहोत", असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.
भारतातील क्लाउड इंजिनिअरिंगचे VP अनिल भन्साळी म्हणाले की, "ग्राहक त्यांचे विश्वासू भागीदार म्हणून Google क्लाउडकडे वळतील, असे उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनीने IBM चे वरिष्ठ कार्यकारी सुब्रम नटराजन यांची भारतातील कामकाजासाठी ग्राहक अभियांत्रिकी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
त्याचबरोबर गुगलने गेल्या वर्षी देशातील दुसरा क्लाउड एरिया सुरु केला आहे. दिल्ली-NCR मध्ये आणि सरकारी क्वार्टरच्याजवळ सर्व आकारांच्या व्यवसायांना विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देण्यासाठी गूगलनं हे सुरु केलं आहे. विशेष म्हणजे आता या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यातही आपलं क्लाउडसंबंधी ऑफिस सुरु करणार आहे.