UP Assembl elections : ‘सपा’ स्‍टार प्रचारक यादीतून आझम खान व कुटुंबीय आउट | पुढारी

UP Assembl elections : 'सपा' स्‍टार प्रचारक यादीतून आझम खान व कुटुंबीय आउट

लखनौ :पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ( UP Assembl elections ) प्रचाराला आता गती आली आहे. राज्‍यात १० फेब्रुवारीला पहिल्‍या टप्‍प्‍यासाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
( UP Assembl elections ) प्रचारासाठी समाजवादी पार्टीने आपली स्‍टार प्रचारक यादी जाहीर केली आहे.

स्‍टार प्रचारक यादीत समाजावादी पार्टीतील सर्वात शक्‍तीशाली नेते अशी ओळख असणारे आझम खान यांना स्‍थान मिळालेले नाही. दरम्‍यान, आझम खान हे भ्रष्‍टाचार प्रकरणी फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहेत. त्‍यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली आहे. नुकतेच त्‍यांच्‍या मुलाला जामीन मंजूर झाली आहे.

UP Assembl elections : स्‍टार प्रचारक यादीत पहिले स्‍थान मुलायमसिंह यादवच

समाजवादी पार्टीच्‍या स्‍टार प्रचारक यादीत पहिले स्‍थान अर्थातच पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांनाच आहे. यानंतर अखिलेश यादव यांचे नाव आहे. तिसर्‍या स्‍थानावर पक्षाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष किरण मय नंदा यांना स्‍थान देण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर पक्षाचे राज्‍यसभा सदस्‍य आणि पार्टी महासचिव राम गोपाल यादव आणि जया बच्‍चन यांच्‍या नावाचा स्‍टार प्रचारक यादीत समावेश आहे.

स्‍टार प्रचारक यादीत अखिलेश यादव यांच्‍या पत्‍नी डिंपल यादव या सहाव्‍या स्‍थानावर आहेत. पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष नरेश उत्तम पटेल आणि विधनासभा नेते राम गोविंद चाैधरी हे अनुक्रमे सातव्‍या व आठव्‍या स्‍थानावर आहेत. भाजपला सोडचिठ्‍ठी देत समाजवादी पार्टीत सहभागी झालेले स्‍वामी प्रसाद मौर्य हे ११ व्‍या स्‍थानी आहे. या यादीत समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान व त्‍यांच्‍या कुटुंबीयांना स्‍थान देण्‍यात आलेले नाही. दरम्‍यान, आझम खान हे भ्रष्‍टाचार प्रकरणी फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहेत. त्‍यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली आहे. नुकतेच त्‍यांच्‍या मुलाला जामीन मंजूर झाली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button