Kiran Mane : राजकीय भूमिकेमुळे किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून काढलं, नेमकं काय घडलं? | पुढारी

Kiran Mane : राजकीय भूमिकेमुळे किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून काढलं, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क 

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulagi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना राजकीय भूमिकेमुळे मालिकेत काम करण्यास मनाई केली आहे. या मालिकेतून त्यांना तडफातडफी काढण्यात आले आहे. पाहूया काय नेमका मुद्दा आहे….

Kiran Mane www.pudhari.news
स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना राजकिय भूमिकेमूळे मालिकेतून काम करण्यास मनाई.

Kiran Mane : विलास पाटील – मुलगी झाली हो

स्टार प्रवाहावरील अल्पावधीचं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली मालिका म्हणजे ‘मुलगी झाली हो’ (Mulagi Zali Ho). या मालिकेत ते माउचे बाबा म्हणजे विलास पाटिल यांची भूमिका साकारत होते. या मालिकेमधील बाप-मुलीचं अनोख नातं असणार्‍या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलीयं. गावराण, रांगड्या आणि साधा सरळ, मनाचा ठाव घेणारा विलास पाटील प्रेक्षकांना आपला वाटतो. पण त्यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 #I_stand_with Kiran Mane
#I_stand_with Kiran Mane

किरण माने जेवढे विलास पाटील या भूमिकेने चर्चेत होते, तेवढेच ते आपल्या राजकीय आणि सामाजिक भूमिकेने नेहमी चर्चेत असतात. वेळोवेळी आपली मते परखडपणे सोशल मीडियावर मांडत असतात. पण त्यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकेमूळे स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ (Mulagi Zali Ho) या मालिकेतून त्यांना  तडफातडफी काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी काही तासांपूर्वी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये लिहले आहे की, काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा ! यातून त्यांनी सुचक इशारा दिला आहे की, तुम्ही मला कितीही संपवायचा प्रयत्न केलात तरी मी पुन्हा मी उभा राहीन.

(Kiran Mane www.pudhari.news

या घटनेमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या मतप्रवाहांच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. स्टार प्रवाहाविरूध्द संतापजनक  प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. सोशल मीडियावर किरण माने यांच्या समर्थनात #I_stand_with Kiran Mane असा ट्रेंड सूरू आहे. तर काहीजण त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देवू लागले आहेत. त्याचबरोबर या घटनेवर सूचक अशा मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kiran Mane www.pudhari.news

या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांस्कृतिक दहशतवाद, वैयक्तिक राजकिय भूमिका या विषयांवर चर्चेला उधाण आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जावू लागले आहेत.

 

Back to top button