Winter : स्त्रीयांना जास्त थंडी का वाजते? | पुढारी

Winter : स्त्रीयांना जास्त थंडी का वाजते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळा (Winter) सुरू झाला की, आपल्याला थंडीची जाणीव होते. वातावरणातील तापमान घसरलं की, शरीराची उष्णता वाढविण्यासाठी मनुष्य वेगवेगळे प्रयोग करतो. पण, हवामानात तापमान कितीही थंडी असो काही लोकांना थंडी वाजतेच, असं का? त्याची कारणं वेगळी असू शकतात. अशा लोकांना थंडी का वाजते, हे पाहुया…

Winter

पुरूष आणि स्त्री दोघेही आपलं शरीर उबदार राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पुरुषांच्या स्नायुचं वस्तुमान स्त्रीच्या तुलनेत जास्त असतं. विश्रांतीवेळी त्याच्या पचनक्रियेत ऊर्जा जास्त जळत असते. त्यामुळे नैसर्गितरित्याच पुरुषांच्या शरीरात जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते. परंतु, स्त्रीयांच्या शरीराची ठेवण वेगळी असते.

स्त्रीयांच्या हातापायातील त्वचेखालील चरबीचा थर हा दुप्पट असतो. त्यामुळे महिलांच्या स्नायूतील उष्णता त्वचेच्या वरच्या थरापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ जातो किंवा पोहोचतही नाही. त्यामुळेच स्त्रीयांना जास्त थंडी वाजत असावी, असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण, स्त्रीच्या पचनक्रियेतील उष्णतेचा स्त्रीयांच्या शरीरावर किती परिणाम होतो, असं अजून सिद्ध झालेलं नाही. (Winter)

Winter

स्त्रीच्या शरीरातील उष्णतेता संबंध तिच्या मासिक पाळीवर अवलंबून असतो. मासिक पाळीपूर्वी तिच्या शरीरातील तापमान ते ३५.९ अंश सेल्सियसपर्यंत असते. मात्र, मासिक पाळी आल्यानंतर तेच तापमान ३६.७ अंश सेल्सियसपर्यंत जाते. तिच्या सेक्स हार्मोन्समुळेही तापमानात फरक झालेला आढळतो.

त्याचबरोबर इस्ट्रोजेन वासोडिलेशेनमुळे तिच्यातील रक्तवाहिन्यांची रुंदी वाढते, त्यामुळे स्त्रीच्या शरीरातील तापमान कमी होते. महिलांना रेनाॅड नावाचा आजार तुलनेने जास्त होते. त्यामध्ये हात, पाय, बोटे, स्तन, कान, नाक यांच्यातील तापमान कमी होते, त्यामुळे थंडी पडली की, हे अवयव बधीर होतात.

हे वाचलंत का? 

पहा व्हिडिओ : Molnupiravir कोव्हिड-19 वरील पहिलं औषध | औषधाबद्दल नेमका वाद आणि साईड इफेक्ट

Back to top button