महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत: महिला आयोगाने गंभीर दखल घेत, दिले कारवाईचे निर्देश | पुढारी

महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत: महिला आयोगाने गंभीर दखल घेत, दिले कारवाईचे निर्देश

पुढारी ऑनलाईन: विविध क्षेत्रातील नामवंत असलेल्या मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. काही मुस्लिम महिलांचे फोटो ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही केली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. याबरोबरच महिला आयोग कार्यालयाने दोषींवर असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत.

राज्य सरकारची मोठी घोषणा, सरकारच्या ताफ्यातील सर्व वाहनं इलेक्ट्रीक असणार

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेत, ट्वीट करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो, प्रोफाइल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून त्यांची माहिती सुल्ली डील नावाच्या ॲप वरून प्रसारित केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. देशातील समाजात तेढ निर्माण करून शांतता बिघडवून, राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर सांगितले आहे. या प्रकारचे ॲप तयार करून गोळा केलेल्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोग कार्यालयाने सायबर विभागाला दिले आहेत.

Immunity Power : घरचं खा अन् प्रतिकारशक्ती वाढवा; रुजुता दिवेकरांचा सल्ला

गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांतुन आपल्या दिसून येते की, सुल्ली डील ॲपवरून नामवंत महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. त्यामुळे ही सर्व माहिती सोशल मीडियावरून तत्काळ काढून टाकण्यात यावी, असेही निर्देश राज्य महिला आयोग कार्यालयाद्वारे देण्यात आले आहेत.

 

दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने असे प्रसिद्ध केलेले फोटो आपल्या ट्वीटरवर शेअर केले होते. या महिलेच्या ट्विटनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या महिलेनेसुद्धा दिल्ली पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हाच मुद्दा उचलून धरला आहे. प्रियांका यांनी मुंबई पोलिस आणि सायबर सेलकडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे. महिलांच्या फोटोंचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब या अॅपवर टाकून त्यांची बदनामी केली जात आहे. याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. यात सहभागी असणारे काही लोक हे मुंबईचे असल्याचेही प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना याबाबत काहीही हाती लागले नाही. त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Back to top button