शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा आंब्याचा राजा अल्फोन्सोची अमेरिकेत करता येणार निर्यात | पुढारी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा आंब्याचा राजा अल्फोन्सोची अमेरिकेत करता येणार निर्यात

पुढारी ऑनलाईन: आंबा पिकवणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारला येत्या हंगामात अमेरिकेत भारतीय आंब्याची निर्यात करण्यासाठी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर (USDA) कडून मान्यता मिळाली आहे. आता मार्चपासून भारताला अल्फोन्सो जातीच्या आंब्याची निर्यात करता येणार आहे. अल्फोन्सो (हापूस) हा भारतातील सर्वात महाग आंबा आहे. त्याला आंब्याचा राजा म्हणतात. 2017 ते 2020 या वर्षात भारताने अमेरिकेला विक्रमी तीन हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली होती. यावरून तेथील लोक भारतीय आंब्याचे मोठे चाहते असल्याचे दिसून येते. 2022 मध्ये आंबा निर्यात नवा विक्रम करेल, असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Siddharth and Saina : अश्‍लील ट्विट प्रकरणी अभिनेता सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी

अमेरिकेतील लोकांना आता भारतातून चांगल्या प्रतीचे आंबे मिळू शकणार आहेत. अमेरिकेने २०२० पासून भारतीय आंब्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कारण कोविड-19 महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादलेल्या निर्बंधांमुळे USDA निरीक्षक भारताला भेट देऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांना रेडिएशन सुविधेची तपासणी करता आली नाही.

दोन्ही देश करणार संयुक्त प्रोटोकॉलचे पालन

23 नोव्हेंबर 2021 रोजी काही महिन्यांपूर्वी झालेल्या 12व्या-अमेरिकन ट्रेड पॉलिसी फोरमच्या बैठकीनुसार, कृषी- शेतकरी कल्याण विभाग आणि युनायटेड स्टेट्स कृषी विभाग यांच्यात एक करार झाला आहे. या कराराअंतर्गत, भारत आणि अमेरिका भारतीय आंबा, डाळिंब आणि अमेरिकन चेरी आणि अल्फाल्फा यांच्या निर्यातीवरील रेडिएशनच्या संयुक्त प्रोटोकॉलचे पालन करतील.

शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात, भाजपविरुद्ध दंड थोपटले

निर्यात किती

भारतीय आंब्याला अमेरिकेत मोठी मागणी आहे. 2017-18 मध्ये भारताने 800 मेट्रिक टन आंबा अमेरिकेला निर्यात केला. यामुळे भारताला $2.75 दशलक्ष इतके उत्पन्न मिळाले. त्याचप्रमाणे, 2018-19 मध्ये $3.63 दशलक्ष किमतीचा 951 मेट्रिक टन आंबा अमेरिकेला निर्यात करण्यात आला. तर 2019-20 या आर्थिक वर्षात US ला $4.35 दशलक्ष किमतीचा 1,095 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला.

या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा

USDA च्या मंजुरीनंतर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या प्रदेशातून उच्च दर्जाच्या आंब्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होईल. ही सर्व आंबा उत्पादक राज्ये आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या राज्यांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठे आंबा उत्पादक प्रदेश आहे.

Boxing : बारा वर्षांच्या मुलीने बॉक्सिंग पंच मारून पाडले झाड

लंगड़ा, चौसा, दसहरी यांचीही निर्यात

या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून लंगडा, चौसा, दसहरी, फजली इत्यादी मधुर जातीच्या आंब्यांची अमेरिकेत निर्यात करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने म्हटले आहे. एप्रिल 2022 पासून डाळिंबाची निर्यातही सुरू होईल. त्याचप्रमाणे भारत एप्रिल 2022 पासून अमेरिकेतून चेरी आणि अल्फाल्फा ड्राय ग्रास आयात करण्यास सुरुवात करेल.

Back to top button