नाशिक : महसुल कर्मचारी बेमुदत संपावर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रलंबित मागण्यासंदर्भात विविध मार्गाने आंदोलन करूनही शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे महसुल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि.४) बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी महसुलच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. कर्मचारी कार्यालया बाहेर अन् अधिकारी दालनात असे चित्र निर्माण झाले आहे. मागण्या मान्य होईपर्यत माघार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे. महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत. पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादेत पार पाडावी. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4,300 वरून 4,600 रुपये करावा. 27 नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी आदी मागण्यांसाठी महसुल कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

