नाशिक : राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र, लॅबचा प्रारंभ

नाशिक : राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र, लॅबचा प्रारंभ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय केंद्र आणि पुणे येथील जीनहेल्थ लॅब ओपीडी प्रारंभ तसेच संगम-२०२३ आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद‌्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) होणार आहे.

आरोग्य विद्यापीठाचा हा ऑनलाइन सोहळा पवई येथील आयआयटी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयआयटी पवईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदनगर परिसरात सुमारे 15 हजार चौरस फुटांत विद्यापीठाचे नवीन विभागीय केंद्र बांधले आहे. या केंद्रामार्फत डिप्लोमा इन ऑप्थाल्मिक सायन्स, ऑप्टोमेट्री हा पदविका अभ्यासक्रम व बी.एस्सी. ऑप्टोमेट्री हा पदवी अभ्यासक्रम शिकविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे येथील शिवाजीनगर परिसरात स्व. डॉ. के. सी. घारपुरे यांच्या पुरातन बंगल्याचे नूतनीकरण करून जीन हेल्थ लॅब सुरू केले आहे. या लॅबद्वारे कर्करोग आणि आनुवांशिक विकार असलेल्या रुग्णांसाठी नाममात्र दरात निदान सुविधा देणार आहेत. आरोग्य विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ मॅनेजमेंट इन पोस्ट कोविड-19 वर्ड संकल्पनेवर 'संगम-2023 (Summit of Academia Networking with Government, Allied Health & Medical Professionals Conference on Health Systems Research & Innovation) आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद‌्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कानिटकर यांनी दिली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news