Uttarakhand | हरिद्वारमध्ये बस दरीत कोसळली, लहान मुलासह दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी | पुढारी

Uttarakhand | हरिद्वारमध्ये बस दरीत कोसळली, लहान मुलासह दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आज बुधवारी भीषण अपघात झाला. हरिद्वारच्या चंडी चौकाजवळ बसचे नियंत्रण सुटल्याने ती २० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ ते ४० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलीस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मृतांमध्ये बसचा चालक आणि एका दहा महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. बसमधून ४० हून अधिक लोक प्रवास करत होते. यातील गंभीर जखमींना एम्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दुसऱ्या एका अपघातात ऋषिकेश- श्रीनगर रस्त्यावर गुलरजवळ मॅक्स वाहन आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात मॅक्समधील १० जणांपैकी ८ जण जखमी झाले आहेत. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. ट्रक चालकही जखमी झाला असून त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button