

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यासह जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अद्याप उकाडा जाणवत असला तरी काही भागांत ढगाळ वातावरण आहे. जून महिन्यातील अखेरचा आठवडा सुरू झाला तरी राज्यात मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. मात्र, हवामान विभागाने सांगितल्यानुसार पुढच्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता आहे. मान्सूनच्या सरी मुंबईसह उत्तर महाराष्ट्रासह कोकणात बरसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे>.
पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मान्सून २३ जूननंतर सुरू होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या रविवारपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरू होईल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. मात्र, पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. (Nashik Monsoon)
नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान |खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याचा अंदाज जाणून घेतच घराबाहेर पडावे अशा सूचनाही दण्यात आल्या आहेत. (Nashik Monsoon)
हेही वाचा :