अहमदनगरमध्ये पाणी कपातीची गरज नाही : जिल्हाधिकारी | पुढारी

अहमदनगरमध्ये पाणी कपातीची गरज नाही : जिल्हाधिकारी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाऊस लांबल्यामुळे खबरदारी म्हणून ऑगस्टपर्यंत टंचाई आराखडा तयार केला आहे. सध्या पाण्याचा स्रोेत भरपूर असल्याने पाणीकपातीची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले. जलजीवन योजनेच्या घोटाळ्याबाबत शासनस्तरावरून काय निर्णय येतो. त्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले. पावसाअभावी खरीप पेरणी खोळंबली आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही उपाययोजना केल्या का याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, जिल्हाधिकारी म्हणाले की, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली तरी टँकरची कमतरता भासणार नाही. जनावरांच्या चार्‍याची कमतरता भासणार नाही, यासाठी चारा वैरण प्रकल्प राबविण्याचे निर्देश कृषी व पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले आहेत.

अहमदनगर शहर आणि इतर ठिकाणी औद्योगिक प्रकल्प वाढीसाठी जागा निश्चित केल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चादेखील झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्हा विकास आराखड्यात पर्यटन आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले आहे. अहमदनगर शहर आणि इतर ठिकाणी औद्योगिक प्रकल्प वाढीसाठी जागा निश्चित केल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय कृषी प्रोसेसिंगला अधिक वाव आहे. यावर अधिक फोकस केला जाणार आहे. निर्यातीसाठी प्रयत्न केले जाणार असून,याबाबत पॅकिंग, हॅन्डलिंग आदीबाबत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

पुण्यातून पाच शहरांसाठी नवी उ

ड्डाणे ; या शहरांचा आहे समावेश

पुणे : संशोधनाला बळ अन् नवसंकल्पनांचा विस्तार ; जी-20 बैठकीची सांगता

Back to top button