येथील विशाखा शैलेंद्र येवले (२६) या उच्च शिक्षित विवाहितेने गेल्या रविवारी (दि.१७) घरचे सर्व लग्नासाठी बाहेर गावी गेले असता रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
विशाखाचा भाऊ तन्मय वेढणे याने, विशाखाचा पती शैलेंद्र व तिचे सासू-सासरे यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अभोणा पोलीस ठाण्यात दिली आहे. अभोणा येथील प्रतिष्ठित व्यापारी व माजी सरपंच राजेंद्र वेढणे यांची पुतणी व महालक्ष्मी किराणा सेंटरचे संचालक नरेंद्र वेढणे यांची कन्या विशाखा हिचा विवाह कळवण येथील शैलेंद्र येवले याच्याशी झाला होता.