

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : परिसरात दहशत पसरविण्यासाठी सोबत पिस्तूल बाळगणार्या तरुणास पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
शस्त्रविरोधी पथकाने सोमवारी (दि. 18) दुपारी साडेचारच्या सुमारास रमाबाईनगर, रावेत येथे ही कारवाई केली.
मोनेश देवेंद्र नाटेकर (23, रा. रमाबाईनगर, रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण वासुदेव मुळूक यांनी रावेत चौकी येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नाटेकर हा परिसरात दहशत पसरवण्यासाठी सोबत पिस्तूल बाळगत होता. याबाबत शस्त्र विरोधी पथकाला माहिती मिळाली.
त्यानुसार, त्यांनी रावेत येथील रमाबाई नगर परिसरात सापळा रचून नाटेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार डी. डी. चौधरी तपास करीत आहेत.
https://youtu.be/1fkBjdzzX90