

नाशिक; पुढारी ऑनलाइन डेस्क – शेतकऱ्याने विकत घेतलेल्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर तलाठ्याने मालकी हक्काबाबत घेतलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी येवला तालुक्यातील राजापूर येथील मंडळ अधिकाऱ्याने 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेतकऱ्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. (Nashik Bribe News)
मनोहर अनिल राठोड, (मंडळ अधिकारी, राजापुर, ता. येवला) असे लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने, राजापूर येथे घेतलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याने मालकी हक्काबात घेतलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी संबधित मंडळ अधिकाऱ्याने 25 हजार रुपयांच्या लाचेली मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचला होता. आज (दि. 31) लाच स्विकारताना एसीबीने या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर हे करित आहे.
हेही वाचा :