

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या चाळीसगावच्या उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (५७, रा. धुळे) यांच्या घरझडतीत साडेचाैदा लाखांचे २७ ताेळे साेन्याचे दागिने मिळाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही घरझडती घेतली असून, विसपुतेंच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शाेध घेतला जात असून, विभागाने विविध बँकांशी पत्रव्यवहार केला आहे. (Nashik Bribe News)
संबधित बातम्या :
ज्ञानेश्वर विसपुते यांनी शनिवारी (दि. १६) गडकरी चौक परिसरातून तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच घेतली होती. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील क्लस्टर विकासाचे चार कोटी रुपये आणि अतिरिक्त सुरक्षेची ३५ लाख रुपये अनामत रक्कम देण्याच्या मोबदल्यात ही लाच घेतल्याचे समाेर आले. दरम्यान, विसपुते याला न्यायालयाने बुधवार (दि. २०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विसपुते यांच्या धुळे येथील घराची झडती घेतली असता, त्यात २७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व काही कागदपत्रे आढळली आहेत. तसेच विविध बँकांमध्येही खाते आढळले आहेत. त्यामुळे विभागातर्फे बँक खाते व स्थावर मालमत्तांची माहिती घेतली जात आहे.
हेही वाचा :