रस्त्यावर पुन्हा अपघात, एक ठार, तीन जखमी www.pudharinews.
रस्त्यावर पुन्हा अपघात, एक ठार, तीन जखमी www.pudharinews.

नाशिक : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर पुन्हा अपघात, एक ठार, तीन जखमी

Published on

मालेगाव, पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यात अपघात सत्र सुरू असून मागील सहा दिवसांत पाचवा अपघात आज शुक्रवारी रात्री झाला. मालेगाव-चाळीसगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. यात एक जण जागीच ठार झाला तर सहप्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मालेगावकडून चाळीसगावच्या दिशेने अॅपेरिक्षा (एम एच ४१ सी ९३९५) जात होती. बोधे फाटा ते शेंदूणी फाटा दरम्यान उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ही रिक्षा मागून धडकली. त्यात एक जण ठार झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या रविवारी याच मार्गावर गिगाव फाट्यावर भाविकांचा टेम्पो पलटून चौघांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्याच दिवशी दुचाकींची समोरासमोर ठोस होऊन एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news