COVID Lockdown in China : ९० लाख लोकसंख्येच्या शहरात कोरोनाचे २ रुग्ण ; चीनने लावला थेट लॉकडाऊन | पुढारी

COVID Lockdown in China : ९० लाख लोकसंख्येच्या शहरात कोरोनाचे २ रुग्ण ; चीनने लावला थेट लॉकडाऊन

बीजिंग; पुढारी ऑनलाईन : ९० लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात चीनने लॉकडाऊन (COVID Lockdown in China) लागू केला आहे. या शहरात कोरोनाचे २ रुग्ण आढळले (Covid Cases) आहेत. लॉकडाऊन दरम्यान, चांगचुन शहरातील रहिवाशांना घरीच राहावे लागेल आणि तपासण्यांच्या तीन फेऱ्या कराव्या लागतील. त्याच वेळी, सर्व अनावश्यक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.

चीनने ९० (COVID Lockdown in China) लाख लोकसंख्या असलेल्या ईशान्येकडील चांगचुन शहरात लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. चांगचुन शहरात फक्त दोन कोरोना आढळले आहेत. असे असूनही, ९० लाख लोकांना घरात कैद करण्याचा कडक निर्णय चीनने घेतला आहे. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच लोकांनी घराबाहेर पडावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, सरकारी पथकांनीही शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी सुरू केली आहे. बाधित आढळलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. चीनने राजधानी बीजिंगसह इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये सुद्धा सतर्कता वाढवली आहे.

लॉकडाऊन (COVID Lockdown in China) दरम्यान, चांगचुन शहरातील रहिवाशांना घरीच राहावे लागणार आहे. तसेच तपासण्यांच्या तीन फेऱ्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्याच वेळी, सर्व अनावश्यक व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत आणि वाहतूक सुविधा देखील पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. या शहरात लॉकडाऊन लागू केले नाही, तर देशातील उर्वरित भागात कोरोना पसरण्याचा धोका आहे, अशी भीती चीनला आहे.

९० लाख लोकसंख्येमध्ये कोरोनाचे फक्त २ रुग्ण

शुक्रवारी, चीनमध्ये देशभरात ३९७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यापैकी ९८ रुग्ण जिलिन प्रांतात आढळून आली आहेत. चांगचुन शहरात फक्त दोन रुग्ण आढळली आहेत. पण, चीनच्या कडक धोरणाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी एक किंवा अधिक प्रकरणे असलेल्या भागात लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button