Mumbai Threat Message
Latest
Threat Message: मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर
पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Threat Message)

