मागील वर्षी कोरोनाने कहर केला; पण भारतीयांनी Google वर ‘हे’ सर्वाधिक सर्च केलंय

मागील वर्षी कोरोनाने कहर केला; पण भारतीयांनी Google वर ‘हे’ सर्वाधिक सर्च केलंय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन वर्षांनंतरही जगभरावर काेराेनाचे संकट कायम आहे.  देशातही कोरोनामुळे मोठं नूकसान झालं आहे. अनेक दिवस लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. कोरोनाची भयानकता सगळ्यांनी अनुभवली आहे. सर्व जण काेराेनाच्‍या दहशतीखाली असताना 'गुगल'वर कोरोनाविषयी जास्त काही सर्च झाले नसल्याचे समोर आलं आहे.

जग बदलले, वर्षे बदलले. कोरोनाचा नवा व्‍हेरियंट आला आहे. कोरोनाची लस आली आहे; पण भारतातील लोक Google वर वेगळच काही जास्त शोधत आहेत. ती गोष्ट म्हणजे आय.पी.एल.

१) इंडियन प्रीमियर लीग (IPL)

२०२१ मध्ये भारतीयांनी वेगवेगळ्या कीवर्डसह सर्वात जास्त IPL शोधले. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने देखील भारतीयांचे क्रिकेट प्रेम कमी करू शकला नाही. २००८ पासून सुरू होणारे वर्ष २०२१ हा आयपीएलचे चौदावा हंगाम होता. त्यात आठ संघांनी भाग घेतला आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने या हंगामात विजय मिळवला.

२) कोविन (Cowin)

या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला हा दुसरा कीवर्ड होता, तो म्हणजे कोविन. नावाप्रमाणेच हे कोरोनाशी संबंधित आहे. आपण ते वापरले आहे. वास्तविक हे २०२१ साली सरकारने जारी केलेले ॲप आहे. याचा वापर कोविडवरील लसीकरणसाठी करण्यात आला. उपलब्ध लसीकरण केंद्रावर स्लॉट बुक करण्यापासून ते लसीकरण प्रमाणपत्र जारी करण्यापर्यंतची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळाली.

३) ICC T20 World Cup

हा तिसरा भारतीयांनी सर्वाधिक शोधला जाणारा कीवर्ड आहे. पहिला ICC T20 विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला. सातवी ICC T20 विश्वचषक स्पर्धा २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणार होती. मात्र कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आले. त्याचे सर्व सामने UAE आणि ओमानमध्ये खेळले. यामध्ये १६ देशांचे संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने ट्रॉफीवर कब्जा केला हाेता.

४) Euro Cup

Euro Cup भारतात सगळ्यात जास्त सर्च केलेला चौथा किवर्ड. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप युरो चषक १९६० मध्ये सुरू झाला. विशेष म्हणजे ही स्पर्धा २०२० मध्येही होणार होती; पण कोरोनामुळे ती २०२१ मध्ये झाली. २०२० मध्ये साठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या स्पर्धेला युरो २०२० असे नाव देण्यात आले. अंतिम सामना इटली आणि इंग्लंड यांच्यात झाला. दोन्ही संघांनी १-१ गोलने बरोबरी साधली. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीच्‍या संघाने विजेतेपद पटकावले.

५) Tokyo Olympics

Tokyo Olympics २०२१ मध्ये पांचवा सर्च झालेला किवर्ड होता. ऑलिम्पिक खेळांचा इतिहास सर्वात जुना आहे. १८९६ मध्ये ही स्‍पर्धा सुरु झाली. २०२१ मध्ये जपानची राजधानी टोकियोमध्‍ये या स्‍पर्धेचे  आयोजित करण्यात आले होते. या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका सर्वाधिक ११३ पदकांसह अव्वल स्थानावर राहिला.  भारताला १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदके मिळाली.

७) फ्री फायर रिडीम कोड

Google Trends वर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, ऑनलाइन गेम २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या कीवर्डच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. गॅरेना फ्री फायर हा ॲक्शन ॲडव्हेंचर गेम आहे. हे अगदी Pubg सारखे आहे ज्यामध्ये रणांगणातील सर्व खेळाडू ऑनलाइन जातात आणि गेमच्या शेवटी एक जिंकतो.

८) कोपा अमेरिका

कोपा अमेरिका ही एक फुटबॉल स्पर्धा आहे ज्यामध्ये दक्षिण अमेरिकन देश भाग घेतात. २०२१ मध्ये भारतीयांनी सर्वाधिक शोधलेल्या कीवर्डच्या यादीत ते आठव्या क्रमांकावर होते. यात ११ देशांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव करत २८ वर्षांनंतर चषकावर कब्जा केला.

९) नीरज चोप्रा

गोल्डन बॉय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीयाला सुवर्णपदक मिळण्याची ही दुसरी वेळ होती.

१०) आर्यन खान

टॉप १० गुगल सर्च कीवर्डमध्ये आर्यन खान हा शेवटचा कीवर्ड होता. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आणि आर्यनसह एकूण ८ जणांना काही अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक केली. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यनला जामीन मिळाला. मात्र, या प्रकरणात समीर वानखेडे, नवाब मलिक या कीवर्डचाही खूप सर्च कऱण्यात आला आहे.

गुगल सर्च बारवर भारतीयांनी सर्वाधिक वेळा टाइप केलेल्या दहा कीवर्डची ही यादी आहे.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news