खरंच भारत सरकारकडून 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सुविधा? जाणून घ्या काय आहे सत्य? | पुढारी

खरंच भारत सरकारकडून 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सुविधा? जाणून घ्या काय आहे सत्य?

पुढारी ऑनलाईन: केंद्र सरकारच्या अनेक योजनांबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारत सरकार ३ महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सुविधा देत असल्याचा दावा केला जात आहे. तुम्हालाही असा काही मेसेज आला असेल. चला तर मग आपण जाणून घेऊ या की, खरंच आपल्या मोफत इंटरनेट मिळणार का

नितेश राणे हेच संताेष परब यांच्‍यावरील हल्ल्याचे सूत्रधार : राज्य सरकारची उच्‍च न्‍यायालयात माहिती

पीआयबीने ट्विट केले

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबीने काही गोष्टींची तपासणी केली आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, एका व्हॉट्सअॅप संदेशात असा दावा केला जात आहे की भारत सरकार 100 दशलक्ष वापरकर्त्यांना 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट देत आहे. पीआयबीने तथ्य तपासणीनंतर हा संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड करू नका असे सांगितले. अशा संदेशांद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणत आहात.

Munmun Dutta : बबीताने सोडला शो, बिग बॉस १५ मध्ये एंट्री

सरकारकडून अशी कोणतीही घोषणा नाही

पीआयबीने आपल्या तथ्य तपासणीत लिहिले आहे की, भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा कोणत्याही बनावट संदेशाच्या लिंकवर तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर किंवा फॉरवर्ड करू नका.


पॅंगोंग तलावावर पूल बांधण्यामागे चीनचा डाव काय? समजून घ्या संपूर्ण प्रकरण

तथ्य तपासणी कशी करायची ते जाणून घ्या?

असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे तथ्य तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

Back to top button