

पुढारी ऑनलाईन डेस्क : निधीवाटपावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करायला सरूवात केली आहे. यावरूनच आज (दि.२४) विधीमंडळात खडाजंगी झाली. सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांचा हा आरोप फेटाळत सर्वांना निधी दिला असल्याचे म्हटले आहे.
विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. "महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक फुटकी कवडी देखील विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळाली नाही. हा एक नवीन पायंडा सुरू झाला आहे. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारवं या मताचा मी नाही आहे. विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिवकवलं आहे, ते तेव्हाच्या सरकारला शिकवलं असत तर अशा प्रकारची परिस्थिती आली नसती. काँग्रेसच्या १५ आमदारांची नावे देतो की, त्यांच्या कामांची स्थगित उठवली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळाले नाही आणि सत्ताधाऱ्यांना निधी दिला हे चुकीचं आहे. याच बजेटमध्ये विरोधी पक्षांतील आमदारांना निधी दिलेल्यांची नाव दाखवतो. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करून कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही अशी भुमिका घेतली जाईल," असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :