MLC Election Update : भाजपची भूमिका जिंकले ते आमचे…आमच्याकडे रत्न आहेत घर फोडण्याची गरज नाही – नाना पटोले

MLC Election Update : भाजपची भूमिका जिंकले ते आमचे…आमच्याकडे रत्न आहेत घर फोडण्याची गरज नाही – नाना पटोले

Published on
पुढारी ऑनलाईन डेस्क :  भाजपला दुसऱ्यांची घर फोडण्याचा फटका बसला आहे.  जेव्हा त्यांच घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल.
नागपूर,अमरावती शिक्षक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपाला अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे. भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला. राज्याच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. सर्व गोष्टी भाजपकडून ठरवून केल्या गेल्या आहेत, अशा शब्दात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. नागपूर, शिक्षक पदवीधर मतदार संघात मोठा विजय संपादित केल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. (MLC Election)
नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा काल (दि.२) निकाल लागला. यानंतर आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी  बोलत असताना म्हणाले,"नाशिकमध्ये कॉंग्रेसचे घर फोडण्याचे जे काम केले ते आमच्या जिव्हारी लागले आहे. आज आमचा एक नेता नेला; पण आम्ही नाशिक मतदारसंघातील भाजपमधील ५० नेते नेऊ, अशी आम्ही रणनिती आखली आहे. आमची किती घरे फोडत आहेत ते आम्ही पाहू. ते ज्या घरातून आले आहेत म्हणजे नागपूर तेथेच त्यांचा पराभव झाला आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, घर फोडण्याचे परिणाम भाजपला भविष्यात भोगावे लागतील. सत्यजीत तांबे यांच्या बाबतीत सविस्तर प्रस्ताव येईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही. हायकमांड यांचा निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

MLC Election Update : तांबे कुटुंबीयांशी व्यक्तीगत वैर नाही

सत्यजीत अपक्ष असला तरी त्यांची भूमिका कॉंग्रेससोबत असणार का? यावर बोलत असताना ते म्हणाले,"आम्हाला कोण जोडत असेल तर त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. आमची तांबे कुटुंबीयांशी व्यक्तिगत वैर नाही. डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म भरताना घेतलेल्या भूमिकेवर आमचा आक्षेप आहे. बाळासाहेब थोरात यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. यावर बोलत असताना म्हणाले मी यावर आज काही बोलणार नाही. ते असेही म्हणाले की, भाजपची भूमिका जिंकले ते आमचे अशी आहे. आम्हाला घर फोडण्याची गरज नाही आमच्याकडे रत्न आहेत. कोणाकडून चोरून आणण्याची गरज नाही.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news