MLC Election News : इलाखा तुम्हारा…धमाका हमारा; सुषमा अंधारेंचा भाजपला डिवचलं | पुढारी

MLC Election News : इलाखा तुम्हारा...धमाका हमारा; सुषमा अंधारेंचा भाजपला डिवचलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवेंद्रजींच्या होम पिचवर मविआचे आजचे प्रदर्शन म्हणजे, ‘इलाखा तुम्हारा..धमाका हमारा’ अशा शब्दात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपला डिवचलं आहे. वाचा सविस्तर बातमी. (MLC Election News )

नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा काल (दि.२) निकाल लागला. तर अमरावती पदवीधर-शिक्षक मतदारसंघांत भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे या मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. फेरमतमोजणी पूर्वी आणि फेरतपासणी नंतरही कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे आघाडीवर आहेत. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. विजयाचे हुकमी एक्के समजल्या जाणाऱ्या नागपूर शिक्षक पदवीधर मतदारसंघात भाजप पक्षाचे उमेदवार पराभूत झाले.

MLC Election News : नागपुरात मविआचा उमेदवार विजयी

देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजप समर्थित आमदार नागो गाणार यांचा अडबाले यांनी पराभव केला. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या सुधाकर अडबोले यांनी १६, ७०० मते मिळवली. तर भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांना ८,२११ मते मिळाली.

यानंतर शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत भाजपला डिवचलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अस म्हटलं आहे की,”रात्रंदिवस इतरांना तुच्छ, हिन लेखत आपणच कसे ताकदवान याचा दर्प बाळगणाऱ्या भाजपचा अहंकार मातीत मिसळायचं काम नागपूर-अमरावतीच्या निकालाने केलंय. देवेंद्रजींच्या होम पिचवर मविआचे आजचे प्रदर्शन म्हणजे, इलाखा तुम्हारा..धमाका हमारा

हेही वाचा

 
 
 
 
 

Back to top button