मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेत बंड करुन भाजपाशी युती करत सरकार स्थापन केले. ते मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातील सत्तांतर राजकीय नाटकाला पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटातील इतर आमदारांनी वेळोवेळी सांगितले आहे की, हे सामान्य आणि गरीब जनतेचं सरकार, जनतेसाठी शक्य असेल तेवढं करु. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत टोला मारला आहे, "सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे चांगलच झोंबलेल दिसतंय." म्हणतं धारेवर धरलं आहे.