Meta ला फटका; महसुलात ४ टक्क्यांनी घट, निव्वळ उत्पन्न ५२ टक्क्यांनी कमी झाले

Meta Fined
Meta Fined
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : फेसबुकची मूळ कंपनी मेटाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, मेटाच्या महसुलात तिसऱ्या तिमाहीत चार टक्क्यांनी घट झाली आहे. मेटाचा महसूल $29 अब्ज डॉलरवरून $27.7 अब्ज डॉलरवर घसरला आहे. त्यामुळे कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात ५२ टक्क्यांनी घट झाली आहे.  या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मेटा महत्त्वपूर्ण बदलांचे नियोजन करत असल्याचेही मेटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

फेसबुकची पेरेंट कंपनी असलेल्या मेटाने बुधवारी नोंदवलेल्या निरिक्षणानुसार, सलग दुसऱ्या तिमाहीत मेटाचे उत्पन्न घसरले आहे. फेसबुकच्या जाहिरातींमध्ये घट झाल्याने महसूलातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मेटाला गुगलची पेरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट इंक आणि मायक्रोसॉफ्टकडून होणारी कमाईही कमी झाली.

एक वर्षापूर्वी मार्ग झुकेरबर्गने आभासी माध्यमांना चालना देण्यासाठी Meta ची स्थापना केली. पण आता कंपनीच्या शेअर्सची किंमतही घसरली आहे, महसूल कमी होत आहे आणि नफाही कमी होत आहे. त्यामुळे मेटाच्या गुंतवणूकदारांसाठी ही धोक्याची घंटा आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला कोणताही लक्षणीय महसूल मिळवता आला नाही. तर तिसऱ्या तिमाहीत मेटाच्या महसुलात चार टक्क्यांनी घट झाली असल्याने गुंतवणूकदारांबरोबर कंपनीलाही याचा फटका बसला आहे.

यानंतर मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी $3 अब्ज डॉलरच्या नुकसानीविषयी बोलताना सांगितले की, कंपनीने २०२३ वर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सध्याचे वातावरण ही कंपनीला मजबूत करण्यास मदत करेल, असेही मत मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news