WhatsApp : व्हॉट्सॲप ऑक्टोबरमध्येच बंद का पडते? मेटाने केला ‘मोठा’ खुलासा

WhatsApp : व्हॉट्सॲप ऑक्टोबरमध्येच बंद का पडते? मेटाने केला ‘मोठा’ खुलासा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲपचा (WhatsApp) सर्व्हर डाऊन झाल्याने मंगळवारी (दि. 25) भारतासह इतर देशांतील युजर्संना मोठा त्रास सहन करावा लागला. लाखो युजर्संचे ॲप आणि वेब क्लायंट सुमारे दोन तास बंद होते. आउटेजमुळे युजर्स मेसेज पाठवू शकले नाहीत किंवा व्हॉट्सॲप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सारख्या सेवा वापरू शकले नाहीत. व्हॉट्सॲपची सेवा जगभरात बंद का झाली?, याबद्दल WhatsApp ची मालकी असलेल्या मेटा कंपनीने खुलासा केला आहे.

कंपनीने दिलेल्या निवेदनात (WhatsApp) प्रवक्त्याने म्हटले आहे की, आमच्या बाजूने तांत्रिक त्रुटीमुळे आउटेज झाला. ही समस्या आता सोडवण्यात आली आहे. दरम्यान, मेटाने अधिक तपशील दिलेला नाही आणि तांत्रिक त्रुटी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. योगायोगाने गेल्या सहा वर्षांपासून व्हॉट्सॲपची सेवा ऑक्टोबरमध्ये बंद होत आहे. याबाबत कंपनीने सांगितले की DNS (डोमेन नेम सिस्टम) संबंधित समस्येमुळे त्यांची सेवा बंद झाली आहे.

मेटाने पोस्ट केलेल्या एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, आमच्या अभियांत्रिकी टीमने यामागील कारणांचा शोध लावला आहे. आमच्या डेटा केंद्रांमधील नेटवर्क रहदारीचे समन्वय करणार्‍या बॅकबोन राउटरवरील कॉन्फिगरेशन बदलांमुळे या दळणवळणात व्यत्यय आणणार्‍या समस्या निर्माण झाल्या. नेटवर्क रहदारीवरील या व्यत्ययाचा आमच्या मार्गावर कॅस्केडिंग प्रभाव पडला. डेटा सेंटर संप्रेषण करत असल्याने आमच्या सेवा बंद होतात. मेटा कंपनीने अधिक तपशील दिला नसला तरी सध्याचा आउटेज अशाच समस्येमुळे निर्माण झाला असावा, अशी शक्यता आहे.

WhatsApp : 25 ऑक्टोबर रोजी व्हॉट्सॲप बंद

25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता आउटेज झाले. आणि दुपारी 2:30 वाजता सेवा पूर्ववत करण्यात आली. त्या सुमारे दोन तासांत, व्हॉट्सॲप युजर्स संदेश आणि मीडिया फाइल्स पाठवू आणि प्राप्त करू शकले नाहीत. युजर्संना फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल करता आला नाही. आउटेज ट्रॅकर, डाउनडिटेक्टरने दाखवले की 69 टक्के युजर्संना संदेश पाठवताना समस्या आल्या, तर 21 टक्के युजर्संना सर्व्हर कनेक्शनशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. सुमारे 9 टक्के युजर्स अज्ञात कारणांमुळे ॲप वापरू शकले नाहीत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news