#Melodi : गुड फ्रेंड्स…, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींसोबतचे फोटो केले शेअर

#Melodi : गुड फ्रेंड्स…, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींसोबतचे फोटो केले शेअर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये जागतिक हवामान शिखर परिषद (COP28) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक बडे नेते दुबईला पोहोचले आहेत. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (#Melodi) यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (#Melodi)

जागतिक हवामान शिखर परिषदे दरम्यान इटलीच्या पंतप्रधान मेलोनी (#Melodi) यांनी हा सेल्फी क्लिक केला आहे. या फोटोत दोघेही हसत आहेत. मेलोनी यांनी नंतर हा सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्यांनी कॅप्शमध्ये 'COP28 मधील चांगले मित्र' असे लिहिले आहे. #Melodi या हॅशटॅगचाही त्यांनी वापर केला आहे. (#Melodi)

यापूर्वी COP28 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांच्या फोटोशूटमध्येही पीएम मोदी आणि मेलोनी (#Melodi) यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघांचे एकत्र हसताना आणि बोलतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. दुबईत आयोजित COP28 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री भारताकडे रवाना झाले. त्यांनी एक्सवर 'धन्यवाद दुबई' असं म्हटले आहे. COP28 शिखर परिषद ३० नोव्हेंबर पासून ते १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पीएम मोदी गुरुवारी दुबईला गेले होते. (#Melodi)

COP म्हणजे काय? (#Melodi)

COP म्हणजे असे देश ज्यांनी १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारावर स्वाक्षरी केली होती. सीओपीची ही २८ वी बैठक आहे. म्हणून याला COP28 म्हटले जात आहे. COP28 पृथ्वीच्या तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राखेल अशी अपेक्षा आहे. २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या करारात सुमारे २०० देशांमध्ये यावर सहमती झाली होती. इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान निरीक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, १.५ अंश सेल्सिअस हे एक महत्त्वाचे लक्ष्य आहे, ज्याद्वारे हवामान बदलाचे धोकादायक परिणाम थांबवले जाऊ शकतात.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news