COP28 climate summit in Dubai: भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद – PM मोदींचा प्रस्ताव | पुढारी

COP28 climate summit in Dubai: भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद - PM मोदींचा प्रस्ताव

पुढारी ऑनलाईन डेस्क: युएईमधील दुबईत कालपासून (दि.३० नोव्हें) २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेला सुरूवात झाली आहे. या परिषदेत पीएम मोदी देखील उपस्थित आहेत. दरम्यान आज (दि.१) परिषदेला संबोधित करताना, पीएम मोदी यांनी COP28 सदस्यांपुढे एक नवीन प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (COP28 climate summit in Dubai)

दुबईत सुरू असलेल्या COP28 परिषदेत पीएम मोदी यांनी ३३ व्या (COP33) हवामान बदल शिखर परिषदेचे भारतात आयोजन करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान २०२८ मध्ये होणारी ही ३३ वी हवामान बदल परिषद ही भारतात व्हावी असा प्रस्ताव पीएम मोदी यांनी दुबईतील COP28 उच्च-स्तरीय समितीसमोर ठेवला आहे, असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (COP28 climate summit in Dubai)

पीएम मोदींनी मानले कॉप-२८ सदस्यांचे आभार

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, १४० कोटी भारतीयांच्यावतीने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आज सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, कारण तुम्ही मी उपस्थित केलेल्या हवामान न्याय, हवामान वित्त आणि ग्रीन क्रेडिट मुद्द्यांचे सातत्याने समर्थन केले आहे. जे विश्वकल्याणासाठी आणि सर्वांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. हे सर्व करण्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग देखील तितकाच आवश्यक आहे. तसेच हा विश्वास आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी वाढला आहे, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

भारताची जागतिक लोकसंख्या १७ %, कार्बन उत्सर्जन केवळ ४ टक्के

पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, भारत हवामान बदल प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्कसाठी वचनबद्ध आहे. म्हणूनच या व्यासपीठावरून मी 2028 मध्ये भारतात COP33 शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवतो आहे. आज भारताने जगासमोर पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संतुलनाचे एक उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. भारतामध्ये जागतिक १७ % लोकसंख्या आहे. असे असूनही, जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचे योगदान हे केवळ ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारत ही जगातील अशा काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी पॅरिस करारातील NDC लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  (COP28 climate summit in Dubai)

भारत 3% अक्षय उर्जेसाठी वचनबद्ध- पीएम मोदी

दुबईतील COP28 च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पीएम मोदी म्हणाले,  भारताने, आपल्या G20 अध्यक्षपदावरून ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेने हवामानाच्या मुद्द्याला सातत्याने महत्त्व दिले आहे. आम्ही एकत्रितपणे हरित विकास करारावर सहमती दर्शवली आहे. आम्ही शाश्वत विकासासाठी जीवनशैली तत्त्वे तयार केली असून, जागतिक स्तरावर 3% अक्षय उर्जेसाठी वचनबद्ध आहोत, असेही पीएम मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button