COP28 हा परिपूर्ण उपाय नाही, कष्ट घ्यावे लागणार- सद्गुरु जग्गी वासुदेव | पुढारी

COP28 हा परिपूर्ण उपाय नाही, कष्ट घ्यावे लागणार- सद्गुरु जग्गी वासुदेव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कालपासून(दि.३० नोव्हें) युएईमधील दुबई शहरात २८ वी हवामान बदल शिखर परिषद सुरू झाली आहे. या परिषदेला ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव हे देखील सहभागी झाले आहे. दरम्यान, दुबईमधून बोलताना, हवामान बदलावर COP हा परिपूर्ण उपाय नसल्याचे परखड मत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे. (COP28 Summit)

सद्गुरू यांनी दुबईमधून माध्यमांशी बोलताना पुढे म्हटले की, COP हा कार्यक्रम जागतिक स्तरावरील कार्यक्रम आहे, त्यामुळे यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. हा एक जागतिक स्तरावरील प्रयत्न असून, हा परिपूर्ण उपाय नाही, असे मत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी व्यक्त केले आहे. (COP28 Summit)

COP28 Summit : सद्गुरुंकडून कार्यशैलीचा पुर्नउच्चार

ज्या प्रकारे भारत इतर राष्ट्रांना उर्जा देत आहे. ज्याप्रकारे भारत आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. ते एका रात्रीत घडणारे नाही. एखाद्या गोष्टीबद्दल प्रथम आपण विचार करतो, मग आपण त्यावर बोलतो, मग त्यात आपल्या भावना गुंतवतो. आणि त्यानंतर आपण एखाद्या गोष्टीसाठी सहमत आहोत किंवा असहमत आहोत यावर मत मांडतो. त्यानंतर आपण सुधारणा करण्यासाठी कार्य करतो, अशी कार्यशैली देखील सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी युएईमधून माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

जागतिक परिषदांमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका-सद्गुरु जग्गी वासुदेव

जागतिक स्तरावरील समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे. COP28 दरम्यान भारत पॅरिस परिषदेत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. हवामान बदल शिखर परिषदेत अनेक आघाडीचे जागतिक नेते गायब आहेत. तसेच या परिषदेतील भारत हा मोठा आणि वेगाने अर्थव्यवस्था वाढणारा देश आहे. त्यामुळे कॉप-२८ मधील भारताचे नेतृत्त्व महत्त्वाचे आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान भारताने पॅरिष परिषदेत जी आश्वासने दिली होती, ती लवकर वेळेच्या आधी पूर्ण केली आहेत, असे देखील सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले आहे.

आफ्रिकन राष्ट्रांना भारताने आवाज दिला

आफ्रिकन राष्ट्रांना G20 मध्ये आणण्यात भारताचा मोलाचा वाटा होता. आफ्रिकन राष्ट्रांना आवाज देणे ही एक मोठी गोष्ट होती, ती भारताने केली आहे. दरम्यान पुढील काही वर्षात आफ्रिकन देशांची मोठी विकासकथा असू शकते. तसेच भारत आणि आफ्रिका एकत्र येत आहेत हे खूप महत्वाचे आहे, असे मत देखील सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी युएईमधील दुबईत सुरू असलेल्या कॉप-२८ परिषदेदरम्यान व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

Back to top button