

लासलगाव(जि. नाशिक) : मराठा समाजाला आरक्षणासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे. मात्र, तोपर्यंत समाजाची मागणीची तीव्रता आणि आक्रोशाची भावना कायम राहावी, यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी रायगड ते अंतरवाली सराटी अशी मशाल जागर यात्रा सुरू केली आहे.
या मशाल जागर यात्रेचे मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरातील बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय', 'जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है'आदी घोषणांमुळे परिसर दणाणून गेला. या वेळी सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मशाल जागर यात्रा निफाड तालुका पूर्व ४६ गावातून मार्गक्रमण करत पुढे जाणार आहे.
सकल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा बांधवांच्या वतीने लासलगाव शहरासह निफाड तालुका पूर्व ४६ गावातून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. मराठा समाजाच्या बरोबरीने इतर समाज बांधव देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपला पाठींबा दर्शवित आहेत.
हेही वाचा :