चंद्रपूर : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या पोटातच खूपसली बिअरची बाटली

चंद्रपूर : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या पोटातच खूपसली बिअरची बाटली
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बाटली खुपसून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी उघडकीस आली. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकातील एका बिअरबारमध्ये तिघेही मित्र बिअर पिण्यासाठी बसले होते. काही बिअर पिल्यानंतरही आणखी बिअर पिण्यासाठी आरोपींनी शाहरुख पठाण या मित्राला पैसे मागितले. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे नशेत असलेल्या इतर दोघांनी बिअरची बाटली त्याच्या पोटात खुपसली. या घटनेत मित्र शाहरुख पठाण हा गंभीर जखमी झाला.

गंभीर जखमी असलेल्या शाहरुख पठाण याला लगेच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी आरोपी मित्र नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news