Yavatmal Crime: कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळीवर 'मोक्का'चा दणका

​उमरखेडमधील ८ सराईत गुन्हेगारांवर कारवाई : गोरक्षकांवर केला होता प्राणघातक हल्ला
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

उमरखेड : कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या आणि पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला चढवून दहशत माजविणाऱ्या सराईत टोळीविरुद्ध यवतमाळ पोलिसांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA - मोक्का) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात आणि अवैध धंदेवाईकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Crime News
Yavatmal Crime : महागाव ग्रामीण रुग्णालयावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला, नर्सिंग ऑफिसरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

​पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, २४ मे २६ रोजी उमरखेड मार्गे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असल्याची कुणकुण गोरक्षक ज्ञानेश्वर मारोती सुरोशे (वय ३१, रा. वडद, ता. महागाव) व त्यांचे भाऊ महेश सुरोशे यांना लागली होती. त्यानुसार त्यांनी पांढऱ्या रंगाचे संशयित बोलेरो पिकअप (क्र. MH 29 BE 8915) आणि सोबत असलेल्या कारचा (क्र. MH 12 PT 8934) पाठलाग सुरू केला.

Crime News
Yavatmal Crime : अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्याला चार वर्षांचा कारावास

​पाठलागादरम्यान मौजे सुकळी फाट्याजवळ आरोपींनी पिकअप रस्त्याच्या बाजूला कट मारून आडवा लावला. त्यानंतर कार व पिकअपमधून उतरलेल्या आरोपींनी आरडाओरड करत फिर्यादी ज्ञानेश्वर सुरोशे आणि त्यांचे सहकारी गजानन सुरोशे यांच्यावर दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत गजानन सुरोशे यांच्या डोक्यावर प्राणघातक वार करून त्यांना गंभीर जखमी केले व आरोपी तिथून पसार झाले. याहल्ल्यात सुरोशेचा मृृत्यु झाला. याप्रकरणी उमरखेड ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News
Yavatmal Crime : दुसऱ्या लग्नात अडसर ठरत असलेल्या पत्नीला पेटविले; उपचारादरम्यान मृत्यू

या प्रकरणी ​सखोल तपासात हा गुन्हा टोळी बनवून संघटितरीत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या गुन्ह्यातील खालील ८ आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. एका अल्पवयीन बालकासह एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे: याबाबत

​शेख सुलतान शेख अल्ताफअली (वय २७, रा. सुकळी, ता. उमरखेड)

​शेख अरबाज अहमद हुसेन (वय २४, रा. राजेंद्रनगर वार्ड, उमरखेड)

​मोहम्मद वसीम मोहम्मद शफी (वय २४, रा. रहिमनगर, उमरखेड)

​नोमानमोद्दीन रियाजोद्दीन काझी (वय २०, रा. सुकळी, ता. उमरखेड)

​शेख अजगर अहमद अब्दुल हमीद (वय १८, रा. सुकळी, ता. उमरखेड)

​नुरोद्दीन ईसामोद्दीन काझी (वय ३०, रा. सुकळी, ता. उमरखेड)

​मोहम्मद अरबाज मोहम्मद शफी (वय २१, रा. रहिमनगर, उमरखेड)

​मोहम्मद अजियम उर्फ आजम मोहम्मद हनीफ (वय ३४, रा. करोडी रोड, उमरखेड) यांचेवर संघटीत गुन्हेगारी विषयी कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली.

Crime News
Yavatmal Crime | पत्नीला वाममार्गाला लावण्याच्या संशयातून आदिवासी महिलेची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

अमरावती परिक्षेत्राकडून प्रस्तावाला मंजुरी

​आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, दहशतीचे वातावरण आणि संघटित गुन्हेगारीचे स्वरूप पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या गुन्ह्यात ‘मोक्का’ कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (पुसद/प्रभारी उमरखेड) अमर मोहिते हे करत आहेत.

Crime News
Yavatmal Crime : दहा हजारांची लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्यास अटक

​दहशत माजवाल तर थेट मोक्का! : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा ​"जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, अवैध गोवंश तस्करी, रेती माफिया, गावठी दारू व टोळीने दहशत निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या अशा सराईत गुन्हेगारांवर यापुढेही 'मोक्का' आणि 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहील."

डॉ. कुमार चिंता (भा.पो.से., पोलीस अधीक्षक, यवतमाळ), अशोक थोरात (अपर पोलीस अधीक्षक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news