PM Modi Visit Yavatmal : यवतमाळ दौऱ्यात पंतप्रधान मोदी कुणाकुणाशी साधणार संवाद ?

PM Modi Visit Yavatmal : यवतमाळ दौऱ्यात पंतप्रधान मोदी कुणाकुणाशी साधणार संवाद ?

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ येथील जाहीर सभा, विविध योजनांचे लोकार्पणाच्या निमित्ताने आज (दि.२८)  तीन तासांच्या दौऱ्यावर विदर्भात येत आहेत. नागपुरात विमानतळावर आगमन व प्रस्थान इतकाच कार्यक्रम असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील नेते, पदाधिकारी आणि विशेषता बुथ आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती आहे. PM Modi Visit Yavatmal

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला संघटनात्मक दृष्ट्या काय विचारणार, आपल्याला काय सांगायचे, कुणाकुणाला भेटणार या सर्वांची उत्सुकता भाजपात आज पहायला मिळाली. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर पंतप्रधान स्वागत स्वीकारणार आहेत. यानंतर काही लोकांशी संवाद साधणार आहेत आणि लगेच हेलिकॉप्टरने यवतमाळ दौऱ्यावर रवाना होणार आहेत. विदर्भात सध्या ढगाळ वातावरण असल्याने परत येताना बाय रोड असाही पर्याय प्रशासनाने ठेवला आहे. PM Modi Visit Yavatmal

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते नागपुरात पुन्हा परत येतील. सायंकाळी सात वाजता ते विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यादरम्यानच्या काळात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पीएमओ ऑफिसकडून या संदर्भात कोण- कोण भेटणार याविषयीची नावे मागण्यात आल्यामुळे 'मोदी है तो मुमकिन है… या आविर्भावात वावरणाऱ्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकीकडे उत्सुकता तर दुसरीकडे मोदी काय विचारणार याविषयीचे कुतूहल आणि चिंता दिसली. शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह स्थानिक भाजप आमदार, विदर्भातील खासदार, माजी खासदार मोदी यांच्या स्वागतासह संवाद साधणार असल्याचे कळते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news