नागपूर : बेसा परिसरात वैद्य इंडस्ट्रीत भीषण आग    | पुढारी

नागपूर : बेसा परिसरात वैद्य इंडस्ट्रीत भीषण आग   

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  बेसा परिसरातील वैद्य इंडस्ट्रीजला बुधवारी रात्री अकराच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत मोठी हानी झाल्याची माहिती आहे. दोन दिवसापूर्वी खरबी शक्ती माता नगर परिसरात दोन सिलेंडरचा स्फोट  होऊन मंडप डेकोरेशनच्या दुकानाला आग लागली होती. तीन दिवसात शहरात मोठी आगीची ही दुसरी घटना आहे. बेसा रोडवर स्वामिधामच्या पुढे घोगलीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला हे वैद्य इंडस्ट्रीज असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. पाच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान ,घटनास्थळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी,छायाचित्रकारांशी स्थानिकांकडून  गैरवर्तन करण्यात आल्याचे या घटनेनंतर पुढे आले.

Back to top button