यवतमाळ: मुलाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याचा खून

यवतमाळ: मुलाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याचा खून
Published on
Updated on

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : मुलाचा व एका युवकाचा वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पित्यावरच आरोपीने चाकूने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संजय किसन बडदे (वय ५५, रा. मुलकी) असे मृताचे नाव आहे. यवतमाळ शहरातील मुलकी परिसरात ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय बडदे यांच्या मुलाचा संशयित अमोल खेड (वय २४, रा. रामकृष्णनगर) याच्याशी वाद झाला. अमोल हा बडदे यांच्या मुलाला मारण्यासाठी दोन वेळा घरावर चालून आला. त्याची समजूत काढून परत पाठविण्यात आले. मात्र,  तो पुन्‍हा धारदार चाकू घेवून पुन्हा बडदे यांच्या घरापुढे आला.त्यावेळी संजय बडदे हे अमोलची समजूत घालण्यासाठी आले असता त्याने बडदे यांचा गळा दाबून चाकूने वार केले.

संजय बडदे यांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.  डॉक्टरांनी त्‍यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. लगेच चौकशी करीत संशयित अमोल खेड याला ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय बडदे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अवधूतवाडी पोलीस ठाण्यात सुरू होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news