ऑक्टोबरमध्ये देशभरातील बँका २१ दिवस सुट्या, कामाचे नियोजन आताच करा! | पुढारी

ऑक्टोबरमध्ये देशभरातील बँका २१ दिवस सुट्या, कामाचे नियोजन आताच करा!

ऑक्टोबरमध्ये देशभरात बँकांना २१ सुट्या - कामाचे नियोजन आताच करा!

पुढारी ऑनलाईन – ऑक्टोबर महिना सणांचा असतो. दसरा, दिवाळी असे महत्त्वाचे सण या महिन्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातर बँका तब्बल २१ दिवस बंद राहणार आहेत. राज्यनिहाय या सुट्यात काही बदल होऊ शकतो. पण तरीही बँकाना जास्त दिवस सुट्या असल्याने नागरिकांना आर्थिक कामांचे नियोजन चांगल्या प्रकारे करावे लागणार आहे. Bank Holidays in October 2022

या सुट्या दुसरा, चौथा शनिवार आणि रविवार धरून आहेत. सुट्यांची ही यादी Economic Times या वेबसाईटवर देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील या सुट्या देशभरातील एकत्रित करून दिल्या आहेत. या सुट्यांत राज्यनिहाय बदल होऊ शकतो.

ऑक्टोबर महिन्यातील देशभरातील बँकाच्या सुट्या खालील प्रमाणे आहेत.
१ ऑक्टोबर – सहामाही आढवा घेण्यासाठी सिक्किममधील बँका १ ऑक्टोबरला बंद राहतील.
२ ऑक्टोबर – गांधी जयंती
३ ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महाअष्ठमी) – त्रिपुरा, ओडिशा, सिक्कीम, मनिपूर, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, मेघालय, केरळ येथील बँकांना सुटी
४ ऑक्टोबर – दुर्गा पूजा, महानवमी, खंडेनवमी, शस्त्रपूजा – अगरतळा, कर्नाटक, ओडिशा, सिक्किम, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मेघालय येथील बँकांना सुटी
५ ऑक्टोबर – दुर्गा पूजा, विजयादशमी दसरा – मनिपूर वगळता देशभरातील बँकांना सुटी
६ ऑक्टोबर – दुर्गापूजा – गंगटोक आणि सिक्किममधील बँकांना सुटी
७ ऑक्टोबर – दुर्गापूजा – गंगटोक, सिक्किम येथील बँकाना सुटी.
८ ऑक्टोबर – पैगंबर जयंती – मध्य प्रदेश, जम्मू, केरळ, हिमाचल प्रदेश येथील बँकांना सुटी
ऑक्टोबर १३ – करवा चौथ – शिमला, हिमाचल प्रदेश येथील बँकांना सुटी
ऑक्टोबर १४ – पैगंबर जयंतीनंतरचा शुक्रवार – जम्मू काश्मीरमधील बँकांना सुटी
ऑक्टोबर २४ – दिवाळी, कालीपूजान – सिक्किम, तेलंगाणा, मनिपूर वगळता देशभर बँकांना सुटी
ऑक्टोबर २५ – लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा – सिक्किम, तेलंगाणा, मनिपूर, राजस्थान वगळता देशभरात बँकांना सुटी
ऑक्टोबर २६ – बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, भाऊबीज, भाईदूज – गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्किम, जम्मू, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, श्रीनगर येथील बँकांना सुटी
ऑक्टोबर २७ – भाईदूज, चित्रगुप्त जयंती, लक्ष्मीपूजा, दीपावली, निंगोल चक्कौबा – सिक्किम, मनिपूर, उत्तर प्रदेश येथील बँकांना सुटी
३१ ऑक्टोबर – सरदार वल्लभाई पटेल जंयती, छटपूजा – गुजरात, बिहार, झारखंड येथील बँकांना सुटी

हेही वाचा

Back to top button