Sudhakar Adbale | शिक्षकांच्या हक्कासाठी सहभागृहाबाहेरही लढेन: आमदार सुधाकर अडबाले

Sudhakar Adbale | शिक्षकांच्या हक्कासाठी सहभागृहाबाहेरही लढेन: आमदार सुधाकर अडबाले
Published on
Updated on

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : भाजपचा गड असलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात झालेला माझा विजय हा प्रत्येकाच्या मनातील सरकारच्या विरोधात असलेला आक्रोश  आहे. शाळा आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याचे काम शासनाने केलेले आहे. 57 हजार जागा शिक्षकांच्या राज्यात रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत. मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे. जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी यापुढेही रस्त्यावर व सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लढा सुरू राहील, असे प्रतिपादन नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ( Sudhakar Adbale)  यांनी सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.

महाविकास आघाडी तर्फे आयोजित  सत्कार समारंभप्रसंगी उत्तर देताना आमदार सुधाकर अडबाले बोलत होते. गांधी चौक येथे विजयी रॅलीचा समारोप झाला. तब्बल 75 वर्षांनी चंद्रपूरला हा सन्मान मिळाल्याबद्दल यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय व सामाजिक संघटनांचे आभार मानले. हा विजय धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा आहे, असे प्रतिपादन आमदार अडबाले (Sudhakar Adbale) यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर होते. तर प्रमुख उपस्थितीत मंचावर सत्कारमूर्ती आमदार सुधाकर अडबाले, सीमाताई अडबाले, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, डॉ.बबनराव तायवाडे, वितेश खांडेकर (जुनी पेन्शन हक्क संघटन अध्यक्ष), राजेंद्र वैद्य, संदिप गिर्हे, रामू तिवारी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, परशुराम धोटे, प्रा. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य शाम धोपटे, राजेंद्र खाडे (विज्युक्टा अध्यक्ष), राजेश नायडू (शिवसेना), दिलीप चौधरी (संभाजी ब्रिगेड), केशवराव ठाकरे (जिल्हाध्यक्ष), श्रीहरी शेंडे (जिल्हा कार्यवाह), लक्ष्मणराव धोबे (कार्याध्यक्ष) विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, तसेच इतर पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सर्व तालुक्यातून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी प्रास्ताविक केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा इतिहास यावेळी विशद केला. तर सतीश मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष विपीन धाबेकर यांनी आभार मानले.

 Sudhakar Adbale  : भव्य विजय रॅलीचे आयोजन

नवनिर्वाचित आमदार म्हणून सुधाकर अडबाले निवडून आल्यानंतर चंद्रपुरात पहिल्यांदा आगमनाप्रित्यार्थ महाविकास आघाडीतर्फे भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव चंद्रपूर ते गांधी चौक अशी भव्य विजय रॅली काढण्यात आली. यात हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाके व ढोलताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदाराचे जोश पूर्ण स्वागत केले.  जुन्या पेन्शन हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अडबाले यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news